कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मार्गावर कौलव येथे ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात भीषण अपघात झाला. आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 वर्षीय मुलगा अथर्व गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये मोटरसायकल चालक श्रीकांत कांबळे, त्यांची बहीण दिपाली कांबळे आणि तीन वर्षीय पुतणी शिवज्ञा यांचा समावेश आहे.जखमी अथर्व गुरुनाथ कांबळे सध्या कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात उपचार घेत आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे तरसंबळे गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून, नातेवाईक आणि गावकरी हृदयद्रावक घटनेमुळे दु:ख व्यक्त करत आहेत.