(फोटो सौजन्य: Instagram)
दिवाळी म्हटलं की रोषणाई, फटाके आणि जल्लोष! पण यंदा एका व्यक्तीने केलेल्या फटाक्याच्या अनोख्या उत्सवाने संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. दिवाळीचे फटाके वेगवगेळ्या किमतीत बाजारात उपलब्ध असतात, प्रत्येकाला महागडा आणि चांगला फटाका खरेदी करण्याची इच्छा असते. अशात नुकताच सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात व्यक्तीने १० लाखांचा फटाका फोडताना दाखवला आहे. १० लाखांचा फटाका कसा फुटेल हे पाहण्यासाठी हजारो लोकांनी व्हिडिओवर हजेरी दर्शवली आणि क्षणातच व्हिडिओ व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये व्यक्ती सर्वांना डोळे उघडे ठेवून सगळ्यात जबरदस्त १० लाखांचा फटाका फुटताना पाहण्यासाठी सज्ज होण्यासाठी सांगतो. यानंतर क्षणातच आकाशात जोरदार फटाका फुटतो. फटाका इतका विशाल असतो की त्याने गगन भरून जाते, त्याचा मोठा रंगमय प्रकाश पाहण्यासारखा असतो. लोक हे दृश्य थक्क तर होतात पण कुणालाही याच्या किमतीवर विश्वास बसत नाही. काही याला AI मानतात तर काही याला एडिटिंगने तयार केलेले दृश्य असल्याची शक्यता वर्तवतात. १० लाखांचा फटाका असल्याचा व्यक्तीचा हा दावा आता खरा की खोटा हे तर स्पष्ट झाले नाही पण व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधले एवढे नक्की. दिवाळीच्या या दिवसांत हा व्हिडिओ आता चांगलाच ट्रेंड करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @theunfilteredankush नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एडिटिंग छान आहे” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “१० लाखांच्या या फटक्यात मजा नाही आली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.