पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीच्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जत्रेत बंदी घालण्याच्या ठरावावर राज्यात गदारोळ झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य कारवाईचे निर्देश दिले, तर खासदार निलेश लंके यांनी परंपरागत उत्सवांना राजकीय हेतूने विकृत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावात मार्च महिन्यात मोठी यात्रा दरवर्षी भरत असते, त्या अनुषंगाने या यात्रेत पुर्वी पासुन सर्वधर्म जातीचे लोक या यात्रेत सामील होतात. मढीची यात्रा ही भटक्यांची पंढरी म्हणुन राज्यात ओळखली जाते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणुन यात्रेकडे बघितले जाते. असं असतानाही येथील ग्रामपंचायतचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड आणि देवस्थान समिती सदस्य यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव घेण्यात आला होता. या प्रकरणावरुन अद्यापही राजकीय वाद सुरु आहेत.