दक्षिण रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यातील नागरिकांसाठी माणगाव येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक गैरसोयी असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दि. १३ मार्च रोजी अचानक रुग्णालयाला भेट देऊन पहाणी करत काही रूग्णांसोबत संवाद साधला. यावेळेस सोनोग्राफी, मॅमोग्राफी सारख्या अद्ययावत मशनरी उपलब्ध असून केवळ तज्ञांची नेमणूक नसल्याने त्या वापरात नसून धूळखात पडल्या असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय औषधसाठा पुरेसा नसल्याचे देखील जाणवल्याने या सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरांवरून करणार असल्याचे देसाई यांनी सांगीतले आहे.