नवी मुंबईतील वाशीमध्ये बाळंतीण संगीता दिनेश खरात यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मागणीतून संतप्त निदर्शने करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी प्रसूतीदरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात संगीता खरात यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, घटनेला आठ दिवस उलटूनही जबाबदार डॉक्टर व आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी निषेध करत न्यायासाठी जोरदार आवाज उठवला.