नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पार्टीसााठी घरी आलेल्या दोन जणांनी दारुच्या नशेत मित्राचा आणि त्याच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम्ज आपार्टमेन्ट मध्ये दोघांची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात आई आणि मुलाचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता, ३१ डिसेंबरची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या दोन मित्रांनीच हत्या केल्याचे समोर आलं आहे. नशेमध्ये असताना मित्रांमध्ये वाद झाला आणि या वादातूनच आई आणि मुलाची हत्या करण्यात आली तर अवघ्या २४ तासामध्ये पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून सध्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.