सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या (फोटो सौजन्य: iStock)
ऑटो बाजारात विविध प्रकारच्या कार ऑफर केल्या जातात. यातही लक्झरी आणि सुपरकारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आजही जेव्हा रस्त्यांवर एखादी सुपरकार फिरताना दिसते तेव्हा आपसूकच सर्वांच्या नजरा त्या कारवर रोखल्या जातात.
खरंतर, सुपरकारचे नाव ऐकताच, प्रचंड स्पीड, उत्तम लूक आणि दमदार परफॉर्मन्स असे चित्र मनात येते. या कार्समध्ये मायलेज, सामानाची जागा किंवा बसण्याची क्षमता फारशी महत्त्वाची नसून त्यांचा खरा उद्देश एक लक्झरी ड्रायव्हिंग अनुभव देणे आहे. जरी या सुपरकार्सची किंमत सहसा खूप जास्त वाटत असली तरी काही मॉडेल्स असे असतात जी इतर सुपरकारपेक्षा स्वस्त असतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Bentley Continental GT Speed ही भले सुपरकार नसली तरी याचा परफॉर्मन्स इतर कोणत्याही कारपेक्षा कमी नाही. 2025 च्या मॉडेलमध्ये कंपनीने W12 इंजिन काढून टाकले आहे आणि त्यात V8 प्लग-इन हायब्रिड सिस्टम समाविष्ट केले आहे. ही कार इलेक्ट्रिक मोडवर देखील धावू शकते. या कारमध्ये 771 हॉर्सपॉवरची शक्ती आहे. तसेच ही कार 0 ते 60 मैल प्रति तासाची स्पीड फक्त 3 सेकंदात गाठते. याची किंमत सुमारे 2.52 कोटी रुपये आहे.
लॅम्बोर्गिनी टेमेरारियोमध्ये ट्विन-टर्बो V8 इंजिन आणि तीन इलेक्ट्रिक मोटर्सचे कॉम्बिनेशन मिळते, जे एकत्रितपणे 907 हॉर्सपॉवरची शक्ती निर्माण करतात. ही सुपरकार फक्त 2.7 सेकंदात 0 ते 60 mph पर्यंत स्पीड वाढवू शकते आणि याचा टॉप स्पीड 213 mph आहे. या कारची किंमत सुमारे 2.42 कोटी रुपये आहे.
फेरारी रोमा आता फक्त कन्व्हर्टिबल व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. या कारमध्ये ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 612 हॉर्सपॉवरची शक्ती निर्माण करते. ही सुपरकार फक्त 3.1 सेकंदात 0 ते 60 mph पर्यंत स्पीड वाढवू शकते आणि याचा टॉप स्पीड 199 mph आहे. या कारची किंमत सुमारे 2.33 कोटी रुपये आहे.
FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
मॅकलरेन आर्टुरा ही कंपनीची एंट्री-लेव्हल सुपरकार आहे आणि प्लग-इन हायब्रिड सिस्टम वापरणारी ही पहिली मॅकलरेन आहे. यात ट्विन-टर्बो V6 इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, जे एकत्रितपणे 690 हॉर्सपॉवर जनरेट करतात. विशेष म्हणजे ही कार फक्त इलेक्ट्रिक मोडवर 21 मैल धावू शकते. या कारची किंमत सुमारे 2.12 कोटी रुपये आहे.
अॅस्टन मार्टिन डीबी१२ ला कंपनी सुपर टूरर म्हणते कारण त्यात मर्सिडीज-एएमजी कडून घेतलेले ट्विन-टर्बो व्ही8 इंजिन आहे, जे 671 हॉर्सपॉवर आणि 590 पौंड-फूट टॉर्क जनरेट करते. ही कार 3.5 सेकंदात 0 ते 60 मैल प्रतितास स्पीड पकडू शकते आणि याचा टॉप स्पीड 202 मैल प्रतितास आहे. 2.10 कोटी रुपयात ही कार खरेदी केली जाऊ शकते.