R Ashwin (Photo Credit- X)
Cheteshwar Pujara on R Ashwin: इंग्लडं दोऱ्यानंतर भारतीय संघ (Team India) अशिया कपसाठी (Asia Cup 2025) जोरदार सुरुवात करत आहे. अशातच, भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) आपला आवडता भावी कोच म्हणून निवडले आहे.
बघायला गेले तर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली संघाला यश कमी आणि पराभव जास्त पहायला मिळाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारतीय संघाला मोठा पराभव पत्करावा लागला, पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळाला. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पण आशिया कपच्या तयारी दरम्यान पुजाराने केलेले विधानामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
ईएसपीएनक्रिकइंफो सोबतच्या एका मुलाखतीत चेतेश्वर पुजाराला विचारण्यात आले की, संघातील असा कोणता सहकारी आहे जो भविष्यात भारताचा प्रशिक्षक बनू शकतो? यावर पुजाराने लगेचच रविचंद्रन अश्विन याचे नाव घेतले. पुजाराने हे फक्त आपले मत म्हणून सांगितले. रविचंद्रन अश्विनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, ज्यामुळे चाहते पूर्णपणे थक्क झाले होते. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रविचंद्रन अश्विन हा भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ७६५ बळी घेतले आहेत.
या यादीत माजी कर्णधार अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५६ बळी मिळवले आहेत.
अश्विनने भारतीय संघासाठी १०६ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५३७ बळी घेतले आहेत.
फलंदाजी करताना त्याने ६ शतके आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ३५०३ धावा केल्या आहेत.
११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये अश्विनने १५६ बळी आणि ७०७ धावा केल्या आहेत.
६५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ७२ बळी आणि १८४ धावा केल्या आहेत.