घरचे पदार्थ मागासवर्गीय वस्तीगृहात आणण्यास मुभा आहे, मात्र बाहेरचे पदार्थ खाण्यास मागवण्यास सक्त मनाई आहे. हा नियम असताना ही पिझ्झाचा मोकळा बॉक्स एका खोलीच्या बाहेर आढळला. ज्या खोलीच्या बाहेर हा बॉक्स आढळला त्या खोलीतील चौघींवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला होता. मात्र कारवाईची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली अन समाज माध्यमांवर संताप निर्माण झाला. त्यानंतर वस्तीगृहाच्या प्रमुख नरहरे यांनी यूटर्न घेतला. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने ही नियमावली आहे. या नियमांचं पालन त्यांनी करावं यासाठी केवळ फक्त नोटीस देण्यात आलीये, मात्र प्रत्यक्षात कारवाई करण्यात आलेली नाही. असा खुलासा देण्यात आला आणि विद्यार्थिनींनी सुद्धा कारवाई झाली नसल्याचं आता म्हटलंय. पण या सगळ्या कारवाईची चौकशी करण्याची मागणी युवती प्रदेशाध्यक्षा सोनवणेंनी केलीये.