वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर पुरतं हादरुन गेलं आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज दुपारी गणेश काळे या रिक्षा चालकाची गोळ्या झाडून तसेच डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली. गणेश काळेचा बळी हा आंदेकर – कोमकर टोळी युद्धातून झालायचे बोलले जाते आहे. गणेश काळे हा कुख्यात कोमकर टोळीतील गुंडाचा भाऊ असून सागर काळे हा सध्या तुरुंगात आहे . गणेश काळेवर अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तब्बल चार गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानेही सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गणेश काळे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत..