माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे – बेंगलोर महामार्गावर 2 तास चक्काजाम आंदोलन करुन शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शविला आहे.एकच जिद्द शक्तिपीठ रद्द च्या घोषणा देत जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये..या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरी सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती.. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती.. काहीही झालं तरी वडीलोपार्जित सांभाळलेल्या जमिनी महामार्गाला देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केलायं..दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी पंचगंगा पुलावरून नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला..मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने मोठी दुर्घटना टळली..यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..यावेळी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देण्यासाठी पंढरपूरला जावून पांडुरंगाला साकडं घालणार असून कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होवू देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.