जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी 7 जिल्हातून तडीपार केल्याने क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तूपकरांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन डॉ. टालेंची तडीपारी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या राजकीय दबावातून झाल्याच्या आरोप केला. पत्रकार परिषदेनंतर तुपकरांच्या शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते. डॉ. टालेंची आंदोलने शेतकऱ्यांसाठी असतात, त्यांचेवर पाच गुन्हे आहेत पन शेतकऱ्यांच्या आंदोलनाशिवाय त्यांचेवर गुन्हे दाखल नाहीत, तडीपारी मध्ये सदर प्रकरण बसत नसतांना देखील लोकसभेचा बदला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी ही कारवाई केली. एस. डी. ओ, ठाणेदार, जिल्हाधिकारी, एस.पी.चा चार्जही प्रतापरावांकडे द्या अशी मागणी तुपकरांनी केली. आता यापुढे प्रतापरावांच्या सगळ्या भानगडी बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळातून तडीपार करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही तुपकरांनी दिला.