अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र झाले आहे. या प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार रोहित पवार केलं. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आमदार रोहित पवार यांनी प्रवेशद्वार जवळपास दोन तास आंदोलन केले. पोलिसांनी शेवटपर्यंत परवानगी न दिल्याने आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दुसऱ्या बाजूने प्रवेशद्वारा जवळ पोहोचत गेटवरून चढून एका पत्रकाराचे हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आलं. यानंतर रोहित पवार यांनी प्रवेशद्वाराजवळ नारळ फोडून गुलाल उधळला. यावेळी रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यानंतर लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला सुरुवात झाली.