अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाने सुमारे 200 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपकडून केला जात असतानाच, भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. या प्रकरणात दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे पैशांचे आमिष दाखवून शेकडो मतदारांना एका ठिकाणी डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
लोकशाहीचे खुलेआम “वस्त्रहरण” सुरू असताना निवडणूक आयोग मात्र मूकदर्शक बनल्याची टीका करत रोहित पवार म्हणाले की, जर अशाच प्रकारे गैरप्रकार सुरू राहणार असतील तर निवडणुका घेण्याचा दिखावा न करता थेट बोली लावून भाजपचे नगरसेवक विजयी घोषित करावेत. त्यामुळे किमान निवडणुकांवर होणारा सरकारी खर्च तरी वाचेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
आज अंबरनाथमध्ये देखील बोगस मतदानाचा दुर्देवी प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथमध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने 200 पेक्षा जास्त महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपा केला होता. दरम्यान पोलिसांनी या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणी 174महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलाय.
यातील काही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अंबरनाथ पोलिसांनी मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी केलेली बेकायदेशीर गर्दी ,बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदान करण्याची तयारी या कालमांतर्गत गुन्हे दाखल केलेत. दरम्यान या महिला भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून बोगस मतदानासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मात्र महिलांना भिवंडी येथून कोणाच्या सांगण्यावरून बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं,यामागचा सूत्रधार कोण याचा सखोल तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत. या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे ,मात्र या महिलांचे भिवंडीचे जे कनेक्शन आहे त्या संदर्भात सखोल तपास करून जी माहिती पुढील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, शिवाय ज्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये ह्या सगळ्या महिला थांबल्या होत्या ,ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
Ans: राज्यातील 23 नगरपालिकांबरोबरच 76 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे.
Ans: अनेक ठिकाणी मतचोरी, बोगस मतदारांचा वापर आणि पैसे वाटपाचे आरोप समोर आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे.






