देशभरात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि गॅस सिलेंडरच्या अवाढव्य दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या किचनमध्ये जणू आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनाच्या महिला आघाडीच्या वतीने भर रस्त्यावर चूल मांडून, त्यावर भाकऱ्या थापून गॅस दरवाढीचा प्रत्यक्ष कृतीतून विरोध केला. कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत भाजप सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.