पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची स्थिती किती खराब आहे, याची चर्चा सुरू असतानाच दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे तर एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केला आहे. तसेच एक मुलगी मृत्यूशी झुंज देत असल्याचेही समजते. भाग्यश्री म्हेत्रे (वय १६), जिया महादेव म्हेत्रे ( वय १६) अशी मृत मुलींची नावे आहेत. सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.