Jaigad crude bomb explosion
लाकडे गोळा करताना काळाचा घाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७ वर्षे, रा. वाटत खंडाळा, जांबारी फाटा) या सकाळी ०६.४५ वाजण्याच्या सुमारास जांभळी फाटा येथील ‘भूत बंगला’ परिसराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. लाकूड तोडत असताना, त्या जागेवर कोणीतरी अज्ञात इसमाने उघड्यावर टाकलेल्या गावठी हातबॉम्बला त्यांचा अचानक हात लागला. हात लागताच बॉम्बचा जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात सौ. रेश्मा सुर्वे यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. या पथकांच्या मदतीने घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला असता, तिथे आणखी तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब मिळून आले. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट व तपास
घटनेची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरीचे मा. अप्पर पोलीस अधीक्षक आणि मा. डी.वाय.एस.पी. श्री. माईनकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
Ans: जयगड परिसरातील जांबारी फाटा येथे लाकडे गोळा करताना एका महिलेचा गावठी हातबॉम्बला स्पर्श झाल्याने जोरदार स्फोट झाला.
Ans: सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७) या गंभीर जखमी झाल्या आहेत.






