गणेश नगर परिसरातील नाल्यावरील पूल जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. या घटनेला आज महिना उलटून गेला असला, तरी संबंधित पुलाची अद्याप पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून, सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. राधाकृष्ण साठे यांनी याआधीही अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप पुलाच्या कामास सुरूवात झाली नाही. “टेंडरची फाईल तयार आहे, पण ती आयुक्तांच्या सहीवर अडकून आहे. जनता मात्र त्रास सहन करत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया साठे यांनी दिली.