(फोटो सौजन्य: instagram)
सोशल मीडियावर दररोज विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ आपल्याला हसवतात, भावुक करतात कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्काही देऊन जातात . इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात यातील काही रंजक घटना लोकांना आकर्षित करतात आणि मग त्या व्हायरल होत जातात. इथे प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. सध्याही असाच एक व्हिडिओ एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका चक्क एका मोठ्या माशाला दारू पाजताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक संतप्त झाले असून, माणूस एखाद्या प्राण्यासोबत असे कसे कसे काय करू शकतो, असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. व्हिडिओतील दृश्ये अनेकांसाठी धक्कादायक असून दारू पाजतात माशासोबत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या माशाला दारू पाजताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या माशाबाबत तो रोहू प्रजातीचा असल्याचा दावा केला जात आहे. तुम्ही नीट पाहिले तर यात दिसते की, व्यक्तीने दोन व्यक्ती उभे आहेत यावेळी त्यांच्यातील एका व्यक्तीचा हातात मासा आहे. व्यक्ती आपल्या एका हातात माशाला पकडतो आणि दुसऱ्या हाताने त्याच्या तोंडात दारू ओतू लागतो, यावेळी मासाही ती दारू पिऊन घेतो. दरम्यान हा संपूर्ण प्रकार व्हायरल होताच आता लोक यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत तर काहीजण या घटनेला गमतीशीर संबोधत याची मजा लुटत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @genuine_laughing_club नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाण्याशिवाय मासा कसा जिवंत असेल… मला वाटते हा AI जनरेट केलेला व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणी किती निर्दयी असू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.