(फोटो सौजन्य: X)
प्रेमात पडताच लोक वेडी होतात असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. काही जण त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी नदी ओलांडतात, तर काही जण जगाशी लढतात. पण जेव्हा असे चित्रपटातील ही दृश्ये सत्यात उतरतात तेव्हा तो कोणत्या वेडेपणाहून कमी वाटतं नाही. रायबरेली येथील एका तरुणाने आपली आशिकी दाखवत असे काही करू पाहिले की त्याने संपूर्ण गावाचं हादरले. त्याचा हा पराक्रम इतका तेजस्वी होता की त्याला वाचवण्यासाठी स्वतः पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यात नक्की काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकारण?
ही घटना रायबरेलीच्या उसरैना गावात घडून आली आहे. झालं असं की, सोमवारी एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर नाराज होऊन हाय व्होल्टेज विजेच्या खांबावर चढला. हे दृश्य पाहून संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमा झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या तरुणाला खाली उतरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता आणि काही केल्या खाली यायला तयार होत नव्हता.
दिवसा सुरू झालेला हा हाय-व्होल्टेज ड्रामा रात्री उशिरा २ वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुणाला खांब्यावरून कसे खाली आणले गेले ते दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकित सिंग असे या तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या मावशीला भेटण्यासाठी उसरैना गावात आला होता. त्याच्या या कृत्याने पोलीस आणि प्रशासन दोघांसाठी मोठे आव्हान बनले मात्र अथक प्रयत्नांनंतर त्या सुरक्षितपाने खाली उतरवण्यात आले आणि त्याचा जीवही वाचला. दरम्यान प्रेमात असे भीषण पाऊल उचलणे फार चुकीची गोष्ट आहे. तरुणाच्या या वेडेपणात त्याचा जीव जाण्याचीही शक्यता होती मात्र सुदैवाने असे काही झाले नाही आणि तो सुखरूप खाली उतरला.
प्रेमिका से नाराज आशिक हाइटेंशन लाइन पर चढ़ा, पुलिस और ग्रामीणों ने आशिक को मनाने की कोशिश की, आशिक का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है !!
यूपी में प्रेमिका से नाराज आशिक ने उठाया ऐसा खौफनाक कदम, मच गया हड़कंप, लोगों की अटक गई सांसें !!
रायबरेली के ऊंचाहार में प्रेमिका से… pic.twitter.com/ZtjScg8gVw
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) June 3, 2025
या घटनेचा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीही संपूर्ण माहिती देण्यात आली असून ही घटना आता वेगवगेळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केली जात आहे. लोक यातील दृश्ये पाहून हादरली आहेत तर काही मुलाच्या या कृत्याला निव्वळ वेडेपणा म्हणत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.