(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर अनेक अनोखे आणि विचित्र व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. यातील दृश्य कधी आपल्याला थक्क करतात, कधी अचंबित करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आताही इथे असेच विचित्र दृश्य दिसून आले ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओतील दृश्य इतकी अजब आहेत की ती पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. काही कीटक अथवा प्राणी इतके किळसवाणे असतात की त्यांना पाहताच आपल्याला कसंतरी व्हायला लागत. यातीलच एक म्हणजे पाल. भितींवर सपाटणारी ही पाल आपल्या अंगावर जरी पडली तर आपली बोलती बंद होते अशात व्हिडिओत एका व्यक्तीच्या शरीरावर पालींचे संपूर्ण साम्राज्यच राज्य करत असल्याचे दिसून आले. केसांपासून ते पायांपर्यंत सर्वत्र पाली चिपकून बसल्या होत्या. हे दृश्य इतके भयाण होते की ते पाहून सर्वच अचंबित झाले, काहींना तर हे दृश्य पाहूनच भीती वाटायला लागली. लोकांनी याला लिजर्ड मॅन अशी उपमाही दिली आहे.
सोशल मीडियावर सध्या पालीसंबंधीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडिओने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, यामध्ये एका व्यक्तीचे शरीर पालींनी भरल्याचे दिसून येते. विशेषत: त्याच्या पँटवर पालींचा मोठा समूहच आहे, तो एकेक करून, त्या पाली बादलीत गोळा करतोय. विशेष म्हणजे, तो ज्या ठिकाणी उभा आहे तिथे सर्वत्र फक्त आणि फक्त पालींचा मुक्त संचार दिसून येत आहे. व्हिडिओत तुम्ही जिथे पाहाल तिथे तुम्हाला फक्त पालीच पाली दिसून येतील. इतक्या मोठ्या प्रमाणात पाली एकाच वेळी अंगावर फिरत असतानाही तो तरुण अजिबात घाबरत नाही. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल व्हिडिओ हा @sports.jx.china नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या व्युज मिळाल्या आहेत तर हजरो लोकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या धक्कादायक घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ओएमजी, माझी चिंता वाढत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटलं की ती पॅंटवरची प्रिंट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा, माझ्यासोबत असं झालं तरमरेन, मला याची खूप भीती वाटते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही