(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. इथे कधी थरारक अपघातांचे दृश्य तर कधी मजेदार जुगाड आणि हैराण करणारे स्टंट्स शेअर केले जातात. याद्वारे आपल्याला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे किंवा इंटरनेटवर सध्या काय सुरु आहे याची माहिती मिळते. इथे अनेकदा काही अकस्मात घडणाऱ्या घटनांचेही व्हिडिओ शेअर होतात. आताही अशाच एका घटनेचा व्हिडिओ इथे शेअर झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांना हादरवून सोडले आहे. व्हिडिओत एक मुलगी इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारताना दिसून आली. आता तिने असं का केलं आणि यात पुढे काय घडलं या सर्वांचीच सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्… थरकाप उडवणारा Video Viral
काय आहे प्रकरण?
मंगळवारी इंदिरा पुलाजवळील अत्रेय ऑर्किड सोसायटीमधील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. ही आग अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर लागली आणि काही वेळातच पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आग लागल्यामुळे सोसायटीमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोक घाबरून गेले. प्राण वाचवण्यासाठी पाच लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे आणि तो व्हेंटिलेटरवर आहे.
यातच आणखीन एका मुलीने आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यात मुलगी इमारतीच्या गॅलरीतून उडी मारताना दिसून येते. यावेळी सोसायटीची लोकही खाली उपस्थित असतात जे गादी घेऊन खाली उभे असतात. मुलगी त्या गादीवर पडते आणि सुदौवाने तिचा यात जीव वाचतो. आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक तपासात एसीच्या एक्सटर्नल युनिटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे.
અમદાવાદના ઈન્દિરા બ્રિજ પાસેના આત્રેય ઓર્ચિડ એપાર્ટમેન્ટમાં ભીષણ આગ!
જીવ બચાવવા મહિલાએ લગાવી મોતની છલાંગ,
લોકોએ નીચે ગાદલા રાખી લોકોના બચાવ્યો જીવ.ઘાયલોને તાત્કાલિક સારવાર અર્થે ખસેડાયા.. #Ahmedabad pic.twitter.com/vgF4exYFTT
— Sagar Patoliya (@kathiyawadiii) April 29, 2025
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ५ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. मुख्य अग्निशमन अधिकारी अमित डोंगरे यांनी सांगितलं की, चौथ्या मजल्यावरून आग पाचव्या मजल्यावर पसरली होती, जिथे अंतर्गत काम सुरू होतं. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि धुराने वातावरण भरून गेलं. त्यांनी सुमारे २०-२५ लोकांना सुरक्षित बाहेर काढल्याचंही सांगितलं. घटनेचा हा व्हिडिओ @kathiyawadiii नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.