(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसेल याचा नेम नाही. इथे असे अनेक विचित्र आणि अजब-गजब प्रकार शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. असे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड करत असतात कारण फार कमी वेळेत ते युजर्सची लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. अशातच आता आणखीन एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे जो आता सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले. त्यातच आता हे ऑपरेशन एका ताईंनी जर जास्तीच मनावर घेतल्याचे व्हिडिओत दिसून आले कारण ताई आपल्या कुंकुवाच्या रक्षणार्थ एक नाही दोन नाही तर तब्बल ५० प्रकारे भांगेत सिंदूर भरते. यात अनेक नवनवीन प्रकार तुम्हाला दिसून येतील जे तुम्ही आजवर पहिलेच काय तर ऐकले पण नसतील. ताईंचा हा पराक्रम अनेक छपरींना लाजवण्यासारखा आहे. व्हिडिओतील मजेदार दृश्य हसून हसून तुमचं पोट दुखावतील. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात व्यक्ती महिलेसमोर माईक ठेवून त्यांनी कोणकोणत्या स्टाईलमध्ये सिंदूर लावलं आहे हे विचारतो ज्याचे उत्तर देत महिला म्हणते की, मी आतापर्यंत अनेक डिझाइन्समध्ये सिंदूर लावले आहे. यांचे वर्णन करताना ती म्हणते की तिने आतापर्यंत, आंब्यावाला, चोकोबारवाला, ३ जी, ४ जी, ५ जी, त्रिशूल, माळा, ओम, शंकर अशा अनेक डिजाईनमध्ये सिंदूर भरले आहे. तर हृदयात आपल्या नवऱ्याचे नाव लिहिले आहे असंही ती व्हिडिओत सांगते. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, महिलेने आतापर्यंत तब्बल ५० डिझाइन्समध्ये आपल्या भांगेत सिंदूर भरलं आहे. व्हिडिओत तिच्या नमुन्यांचे काही चित्र देखील दाखवले आहेत जे पाहून तुम्हाला तुमचे हसूच आवरता येणार नाही.
महिलेचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओला @biharivijaynews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ती पन्नास प्रकारच्या डिझाइनमध्ये सिंदूर लावते’ असे सांगण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिंदूरपगलू” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ऑपरेशन सिंदूरची सीईओ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे सिंदूर नाही, ती तर डोक्यावर रांगोळी काढत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.