लग्नाचे विधी सुरु असताना वारंवार नवरीच्या खोलीत जाणं एका नवऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. मुलगा सारखा होणाऱ्या बायकोच्या खोलीत जातोय हे बघून मुलाच्या वडिलांनीच त्याच्या थोबाडीत मारलं. मुलानेही मग वडिलांवर हात उगारला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर मुलीला राग आला आणि तिने लग्न करायलाच नकार दिला.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्रकूट जिल्ह्यातील शिवरामपूर पोलीस स्टेशन (Shivrampur Police Station) परिसरात एका गावातल्या मुलीचं लग्न (Marriage News) कानपूरच्या बर्रा भागात राहणाऱ्या मुलासोबत ठरलं होतं. तिची वरात घरी आली. सगळं नीट सुरु होतं आणि होणाऱ्या बायकोचं सौंदर्य पाहून नवरोबाला तिच्यापासून एक क्षणही लांब राहावतं नव्हतं.
[read_also content=”डोंबिवली हादरली, मित्रासोबत फिरायला गेली अन् नराधमांनी पोलीस असल्याचं भासवत साधला डाव, पुढे काय घडलं ? https://www.navarashtra.com/maharashtra/rape-on-minor-girl-in-dombivali-nrsr-365144.html”]
नवऱ्याला ही गोष्ट माहिती होती की त्यांच्या कुटुंबात लग्नाच्या 4-5 दिवसानंतरच मुलीला माहेरी पाठवतात आणि मग भरपूर दिवसांनी नवरी परत येते. त्याला ही गोष्ट खटकत होती. तो लग्नाचे विधी सुरु असताना वारंवार नवरीच्या खोलीत जाऊन तिला समजावत होता.
वडिलांनीच उचलला हात
लग्नाचे विधी सुरु असताना आपला मुलगा सारखा होणाऱ्या सुनेच्या खोलीत जातोय हे पाहून मुलाच्या वडिलांनीच त्याला थोबाडीत मारलं. मुलानेही मग रागात आपल्या वडिलांवर हात उगारला. दोघांची भांडणं सुरु आहेत हे नवऱ्या मुलीच्या कानावर आलं आणि अशा लोकांच्या घरी मला जायचं नाही,असं सांगत मुलीने लग्नाला नकार दिला.
नवऱ्या मुलीचा आरोप काय ?
नवऱ्या मुलीचा आरोप आहे की, नवरा अनेकदा तिच्याजवळ आला आणि म्हणाला की एक वर्ष तुला माहेरी पाठवणार नाही. शिक्षण पूर्ण करायचं असेल तर सासरी कानपूरमध्येच ते करावं लागेल. चित्रकूटला येता येणार नाही. या गोष्टीचं मुलीला आधीच टेन्शन आलं होतं. त्यानंतर बापलेकाच्या कानशिलात लगावणाऱ्या प्रसंगामुळे तिला धक्काच बसला. तिने मग लग्नाला नकार दिला.
नवरीच्या या निर्णयानंतर लग्नाचे विधी थांबवण्यात आले. लग्नातला हंगामा बघून पोलिसांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. मात्र कुणीही काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं. दोघांनी आपापला खर्च केलेला पैसा परत करायचं ठरवलं आणि देण्याघेण्याच्या बाबतीतलं बोलणं झाल्यावर वर पक्ष तसाच परत गेला.