(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील दृश्ये नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे असतात. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला चकित करतील. अनेकदा प्राणी आपला रास्ता विसरतात आणि जेवणाच्या शोधात लोकांच्या घरावर हल्ला करतात. आताही इंटरनेटवर असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. वास्तविक, या घटनेत एका बैलाने आणि गाईने धुडगूस घातल्याचे दिसून आले. त्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा इतका भयानक होता की घरातील सर्वच लोक घाबरले आणि त्यांच्यापासून आपला पळ काढू लागले. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय प्रकरण आहे?
माहितीनुसार, ही घटना हरियाणामधील फरीदाबाद इथली आहे. यात अचानक एका गायीने आणि बैलाने घराच्या आत घुसून उच्छाद घालण्यास सुरुवात केली. दोघांनीही घरभर असा तांडव घातला की त्याने आजीबाजूची लोकही हादरली. दोघांनी मिळून जवळपास 50-60 गोष्टींची तोडफोड केली. यावेळी लोकांनी काठ्या घेऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला खरा मात्र यात काहीच निष्पन्न झाले नाही. बैलाचे रौद्र रूप इतके भयानक होते की त्यापुढे कुणाचाही निकाल लागला नाही. बैलाचे भयाण रूप पाहून घरातली एक महिला अक्षरशः कपाटात जाऊन लपली पण बैलाने कपाटावरही आपला हल्ला चढवला. मात्र या हल्ल्यात सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही आणि ती वाचली.
फरीदाबाद में बुधवार को गाय और सांड एक घर में घुस गए।
महिला ने आलमारी में 2 घंटे तक छिपकर अपनी जान बचाई।
बड़ी मुश्किल से पशुओं को घर से निकाला जा सका#faridabad #BreakingNews #news pic.twitter.com/cw21inX1RX
— Indian Observer (@ag_Journalist) March 27, 2025
शेवटी या बैलाला पकडण्यासाठी वनविभागाला बोलवण्यात आले. बैल काही केल्या बेडवरून हलायला तयारच नव्हता तर गाय किचनमध्ये ठाण मांडून बसली होती. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वन अधिकाऱ्यांना यश आले आणि त्यांनी दोघांनाही घराबाहेर काढले. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोक यातील दृश्ये पाहून हादरली असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “गाय माता त्यांच्या घरी आली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा हे का आणि कसे झाले हे”. हा व्हायरल व्हिडिओ @ag_Journalist नावाने शेअर करण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.