(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्हाला निरनिराळया प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील बऱ्याच गोष्टी शेअर केले जातात. प्राण्यांचे हे व्हिडिओ लोकांना फार मनोरंजक वाटतात ज्यामुळे कमी वेळातच ते व्हायरल होतात. आताही इथे असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात काही लांडग्यांनी मिळून एकट्या कुत्र्याला घेतल्याचे दिसून येत आहे मात्र खेळ तेव्हा बदलतो जेव्हा कुत्रा या लांडग्यावर पलटवार करतो. हे दृश्य क्षणातच एक वेगळे वळण घेते जे पाहणे फार मनोरंजक ठरते. व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा धैर्याने अनेक धोकादायक लांडग्यांचा सामना करताना दिसून येत आहे. हा कुत्रा त्याच्या ताकद आणि धैर्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या शौर्याचे अप्रतिम प्रदर्शन केले आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा एकटा दिसतो, अनेक लांडगे त्याला एकटा बघत त्याचा पाठलाग करतात. कुत्र्याला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे दृश्य खूप भितीदायक आहे, कारण लांडगे पॅकमध्ये हल्ला करतात आणि खूप धोकादायक असतात. पण कुत्रा घाबरत नाही आणि धैर्याने त्यांचा सामना करतो.
श्वानाने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्याने आपल्या ताकदीने आणि धैर्याने लांडग्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. श्वानाचा हल्ला पाहताच लांडगे घाबरले आणि त्याचे शौर्य पाहून लांडगे उलटे पाय घेऊन पळून जाऊ लागले. अखेरीस, सर्व लांडग्यांनी पराभव स्वीकारला आणि तेथून पळ काढला. एकच कुत्रा इतक्या लांडग्यांना पळवून लावू शकतो हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लोक आता याला वेगाने शेअर करत आहेत.
Anatolian shepherd dog against a pack of wolves pic.twitter.com/lIBG7h7clN
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) January 28, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो गोड पिल्लू एक हिरो आहे! छान काम केलेस मित्रा!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “धाडसी कुत्रा आणि त्याने त्या सर्वांना धूळ चाखवली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.