बुर्ज खलिफावर दिसले 'Blood Moon'चे अद्भुत दृश्य; 'टाईमलॅप्स' व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काल ७ सप्टेंबरच्या रात्री भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळाली. संपूर्ण जगभरात चंद्रग्रहण पाहायला मिळाले, पण चंद्रग्रहण अत्यंत खास होते. कारण यावेळ चंद्र रक्तासारखा लाल बूंद असा पाहायला मिळाला, ज्याला Blood Moon असे म्हटले जाते. भारता, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, मध्य पूर्वे यांसरख्या अनेक भागांमध्ये ब्लड मूनचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. सध्या संयुक्त अरब अमिरातीमधील बुर्ज खलिफा येथील दिसलेल्या ब्लड मूनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सर्वांना मंत्रमुग्ध करत आहे.
हा एक टाइमलॅप्स व्हिडिओ आहे. जो जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफात्या मागून लाल चंद्र हळूहळू वर सरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि शेअर केला आहे. यावेळेचे चंद्रग्रहण हे अत्यंत खास होते. कारण केवळ भारतच नव्हे, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आणि युरोपमधील लोकांसाठी देखील ही एक अद्भुत घटना होती. शिवाय ब्लड मून चे दृश्य देखील अनेक वर्षांनी दिसले होते. तसेच २०२५ मधील हे शेवटचे चंद्रग्रहण होते, जे जवळपास ८० मिनिटे चालले.
काय असते चंद्रग्रहण?
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा प्रकाश कमी होतो आणि चंद्र लाल गडद रंगाचा दिसतो. साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळते. यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मी़डिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pixtarami या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहे, लोकांना भुरळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहणार नाही, इतका अद्भुत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.