जंगलातील वास्तव! वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाने उडी मारली पण...; अवघ्या १० सेकंदातच संपला खेळ, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाख व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये जंगतील प्राण्यांच्या अद्भुत आणि हैरणा करणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. माणसांप्रमाणे प्राण्यांचेही आयुष्य कठीण असते. जसे संघर्ष मानवाच्या जीवनात अनुभवायला मिळतात, तसचे संघर्ष प्राण्याच्याही जीवनात असतात.
अन्न, निवाराच्या प्राण्याला देखील गरज असते. अनेकदा जंगलातील वास्तव खूप भयानक असते. ताकदवार प्राण्यांसाठी थोडेफार आयुष्य सोपे कदाचित सोपे असेल, पण हरीण, ससा यांसारख्या प्राण्यांसाठी जरा अवघडच म्हणायचे. कधी, कुठून, कसा एखाद्या वाघाचा, सिंहाचा, मगरींच हल्ला होईल सांगता येत नाही. पण हेच वास्तव असते. असे नाही की, वाघ, सिंह, लांडगा यांच्या आयुष्यात संघर्ष नसले. त्यांनाही बरेच दिवस शिकार न मिळण्याची शक्यता असते. सध्या असाच एक भयानक वास्तवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
यामध्ये वाघाने एका हरणाची शिकार केवळ १० सेकंदात केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हरणाचा कळप जंगलातून जात असतो. याच वेळी एक वाघ झाडाझुडपात लपून बसलेला तुम्ही पाहायला. संधी मिळताच वाघ हरणाच्या कळपावर हल्ला करतो. सगळी हरणे जीव वाचवण्यासाठी पळू लागतात. यामध्ये वाघ एका हरणाच्या मानेवर हल्ला करत त्याला खाली पडतो आणि त्याला ओढत घेऊन बाजूला जातो. हरणाला आपला जीव वाचवण्याची संधी देखील मिळत नाही. या व्हिडिओवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, अनेकदा वास्तव हे कितीही भयानक असले, तरी ते जीवनाचा भाग आहे. जंगालमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारुन खाणे हे निश्चितच आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @travel.kannadiga या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. काहींनी यावर हरणाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे, तर काहींनी वाघाच्या चपळतेचे कौतुक केले आहे. ही घटना कर्नाटकच्या नागरहोळे पार्कमध्ये घडली आहे. सध्या या भयावह प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.