शेवटी लेक ती लेक! वडिल आणि मुलीच्या नात्याचा 'हा' VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ; पाहा हृदयस्पर्शी क्षण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Father-Daughter Love Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप आल्याशिवाय राहत नाही. तर काही व्हिडिओ इतके हृदयस्पर्शी असतात की पाहून डोळ्यात पाणी येते. सध्या असाच एक वडिल आणि मुलीच्या नात्याचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक चिमुकली आपल्या मूक वडिलांचा आवाज बनली आहे. हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. पानिपतमधील हा व्हिडिओ आहे.
वडिल आणि मुलीचे नाते एक खूप खास असते. असे म्हणतात प्रत्येक वडीलांचे आपल्या मुलीवर जीवपाडप्रेम असते, तर मुलीचाही बाबा हा सर्वात लाडका असतो. अगदी फुलांसारखे नाते असेत. बाप आपल्या राजकुमारीचे सगळे हट्ट पुरवतो. तसेच राजकूमारी देखील आपल्या बाबांची तितकीच काळजी घेते आहे. आज या नात्याचा प्रत्यय आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी आपल्या वडिलांसोबत आहेत. वडिलांसोबत राहून दिवाळीचे सामान विकत आहे. याच वेळी एक ग्राहक येतो. यावेळी चिमुकली आपल्या वडिलांसोबत दुकान संभाळताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, मुलगी आपल्या वडिलांसाठी ग्राहकाशी बोलत आहे. ती मूक लोकांच्या भाषेत साइन लँग्लवेजमध्ये वडिलांशी बोलताना दिसत आहे. यावरुन लक्षात येते की तिचे वडिल कदाचित मूक-बधिर असावेत आणि चिमुकली आपल्या वडिलांसाठी आवाज बनली आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओ अनेकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
व्हायरल व्हिडिओ
Papa can’t speak, but his daughter
runs the shop helping him every day 📍 Panipat: Old Bus Stand, near Shukdev Nagar Gate 1, opposite Parveen Medical If you’re nearby, buy something
A little help can mean a lot 🙏🏻 pic.twitter.com/wfD7f8NgUQ — Adv. Homi Devang Kapoor (@Homidevang31) October 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Homidevang31 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी मुलीसाठी बापच तिचा सर्वस्व असतो असे म्हटले आहे. चिमुकलीचे भरभरुन कौतुक केले जात आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, मला ही मुलगीच हवी आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
OMG! ९३व्या वर्षी बाबा झाला; पत्नी ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार सुरू…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.