फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. फक्त सामान्य लोकच नाही तर अनेक सरकारी ऑफिसर देखील असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तुम्ही भारतीय पोलिसांचे त्यांच्या ऑफिसिअल अकाऊंटवर असे व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा हे व्हिडिओ मनोरंडक देखील असतात. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर असाच एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
काल गुगलचा 26 वा वाढदिवस म्हणजे वर्धापन दिन होता. गुगलला 26 वर्षे पुर्ण झाली. अशातच दिल्ली पोलिसांनी गुगला शुभेच्छा दिल्या आणि काही अनोखे प्रश्न विचारले. ज्याची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत. याचा व्हिडिओ पोलिसांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपल्या अकाऊंटवरून शेअर केलेल्या रीलमध्ये, Google च्या 26 व्या वर्धापन दिनाच्या डूडलच्या चित्रासोबत लिहिले आहे की, Google, आपण 26 वर्षांचे आहात, परंतु आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का असे विचारून त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत.
पोलिसांनी विचारले अनोखे प्रश्न
पहिला प्रश्न पोलिसांनी असा विचारला की, लोक कमी विजिबीलीटी असल्यावर त्यांच्या गाडीचे हेडलाइट्स का बंद करतात? तर दुसरा प्रश्न म्हणजे लोक ड्रायव्हिंग करताना टेक्स्ट का करतात? या दोन्हींची उत्तरे गुगलने दिलेली नाहीत. आणखी एक प्रश्न आहे की, लोक त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डवर पाय का ठेवतात? यानंतर लोक वळणावर गाडी का ओव्हरटेक करतात. पाचवा प्रश्न असा की रीअर व्ह्यू मिररमध्ये लोकांना स्वतःचा चेहरा का दिसतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गुगला देता आलेली नाहीत. हे प्रश्न अशा गोष्टींवर आहेत ज्यामुळे सुरक्षा कमी होते आणि मोठे नुकसान होते.
व्हिडिओ
हे प्रश्न पाहून लोकांच्या अनोख्या प्रतिक्रीया
या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, आम्ही पण गुगलला असे प्रश्न विचारून बघितले पण या प्रश्नांची उत्तरे काही मिळाली नाहीत. एका युजरने म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी शेअर केलेले अप्रतिम मीम्स मला खूप आवडले. ते खरोखर आश्चर्यकारक आहेत. या व्हिडिओला अवघ्या 8 तासात 35 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अशा प्रश्नांची उत्तरे गुगला कशी माहित असतील, बिचारा गुगल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, गुगल परिक्षेत नापास झाला आता त्याला पुन्हा त्याच वर्गात बसवा. अशी मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.