फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर आपल्याला रोज नवीन काही ना काही आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. डान्स रील्स, भांडणाचे व्हिडिओ हे व्हायरल होणे सामान्य बाब आहे. पण जेव्हा जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होतात ते पाहिल्यावर आवाक् होऊन जातो. अनेकदा लोक असे भन्नाट जुगाड करतात की, पाहून लोकांची उत्सुकता वाढते. असे जुगाड लोकांसाठी फायदेशीर देखील ठरतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक मारुती डिझायर कार शेतीच्या कामासाठी वापरली जात असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या कारचा वापर असामान्य पद्धतीने केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी जुगाड करणाऱ्याचे कौतुक केले आहे. पंजाबमधील एका व्यक्तीने हे अनोखे तंत्र तयार केले आहे. शेतकऱ्यांसाठी हे एक उत्तम आणि फायदेशीर आहे.
कारला जोडले नागंर
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारच्या मागच्या बाजूला नांगर जोडलेले आहे. सहसा ट्रॅक्टरला आपण नांगर पाहिला असेल. पण या व्यक्तीने मारूती डिझायर कारला नांगर जोडलेला आहे. ही कार शेतात नांगरण्याचे काम करते, ज्यामुळे मदत होते. हा व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करत आहे. कार शेतात चालवताना दाखवण्यात आली आहे. शेतकरी समस्यांवर उपाय किती सर्जनशील असू शकतात हे या जुगाडाचे उत्तम उदाहरण आहे.
हे देखील वाचा- फक्त एका पॉपकॉर्नने बनवले वेडे; 9 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ, जाणून घ्या काय आहे खास
व्हायरल व्हिडिओ
व्हिडिओमुळे लोकांची उत्सुकता वाढली
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर field_shakti_implements या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. हा जुगाड पाहून अनेकजण दंग झाले आहेत. याला लोक देशी इनोवेशन म्हणत आहेत. अनेकजणांनी म्हटले आहे की, आता शेतात ट्रॅक्टरऐवजी गाड्या चालतील अशी खिल्ली काही जणांनी उडवली आहे. काही लोकांनी या जुगाडाला अप्रतिम म्हटले आहे. तर अनेकजण याकडे पर्यावरण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. लोक म्हणत आहेत की, शेतीमध्ये कार वापरल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो जे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते असे म्हणत आहेत.