(फोटो सौजन्य: Instagram)
लहान मुलं दिसायला लहान असली तरी त्यांचे पराक्रम मात्र फार मोठे असतात. मुलं कधी काय करून बसतील याचा नेम नाही आणि म्हणूनच पालकांना त्याच्यावर सतत नजर ठेवावी लागते. क्षणभर जरी पालकांची नजर जर मुलावरून हटली तर काहीतरी मोठं घडणार एवढं नक्की… आता हेच बघा ना, खेळण्या-खेळण्याच्या नादात मुलाने चक्क खेळण्यातली कार हायवेवर नेली आणि मग जे घडलं ते संपूर्ण जगाने पाहिलं. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ फार चर्चेत आहे ज्याने सर्वांचा श्वास रोखून धरला आहे. घटना १४ जुलै रोजी चीनच्या शेडोंग प्रांतातील किंगदाओ येथील आहे. यामध्ये २-३ वर्षांचा एक मुलगा हायवेवर मोठ्या गाड्यांमध्ये खेळण्यांची गाडी चालवताना दिसून आला. मुख्य म्हणजे यावेळी तो एकटा नव्हता तर त्याची आई त्याला पकडण्यासाठी हायवेवर धावताना दिसून आली. चिमुकल्याने मजा मस्तीत एक धोकादायक पाऊल उचलले ज्याने सर्वांच्याच कपाळावरच्या आठ्या उंचावल्या. यात त्याचा जीव जाण्याचा धोका खूप जास्त होता पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हायवेवरील तीन गाड्यांच्या चालकांनी त्यांचे धोकादायक दिवे त्वरित चालू केले आणि वेग कमी केला. त्यानंतर त्यांनी मुलाला वाहतुकीपासून वाचवण्यासाठी तीन बाजूंनी फिरवले. यामुळे आईला तिच्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी झाओ म्हणाले की, मुलाला हा खेळ वाटला, ज्या गावात मूल राहते ते गाव एका हायवेजवळ आहे जिथून अनेक हाय-स्पीड कार आणि ट्रक जातात. म्हणूनच, त्यांनी पालकांना त्यांच्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा इशारा दिला जेणेकरून अशा धोकादायक घटना पुन्हा घडू नयेत.
पांचट Jokes : बायकोच्या बडबडीत नवऱ्याचा शिष्टाचार मागे पडला; मग काय घडलं ते वाचा अन् खळखळून हसा
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हेवी रायडर
” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलं देवाघरची फुलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याचा जीव वाचला का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.