(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल सध्या जोरदार धुमाकूळ घालता आहे, ज्यामध्ये हवेचा राक्षस म्हणजेच गरुड चक्क एका बिबट्याची शिकार करताना दिसून आला. शिकारीचे हे थरारक दृश्य पाहून सर्वच अवाक् झाले कारण हे दृश्य याआधी कुणीही कधी पाहिलं नाही. व्हिडिओमध्ये गरुड दुरूनच बिबट्यावर निशाणा साधत असल्याचे दिसून येते, ज्यांनंतर त्याला जशी संधी मिळते तो त्यावर वार करतो आणि बिबट्याला थेट हवेत उडवतो. हा हल्ला फारच भयानक असून ज्याने तो पाहिला त्याच्या अंगावर काटा आला. चला यात पूढे काय घडले ते जाणून घेऊया.
आई आहे का कैदाशीन? पोटच्या पोराला लाथेने तुडवलं, डोकं पकडलं अन्… थरकाप उडवणारा Video Viral
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की गरुड हवेतून आला आणि त्याने थेट आपल्या मजबूत नखांनी बिबट्याची मान पकडली आणि अवकाशात त्याला उडवून नेले. यातील सर्वात धक्कादायक दृश्य म्हणजे चित्तासारखा प्रचंड आणि शक्तिशाली प्राणी गरुडाच्या पंजात अडकलेला दिसतो. गरुडाची झेप, त्याची तीक्ष्ण दृष्टी आणि त्याचा हल्ला करण्याचा वेग पाहून सर्वजण थक्क होतात. सहसा गरुड ससे, साप किंवा लहान पक्षी यांसारख्या लहान प्राण्यांची शिकार करतात. पण या व्हिडिओमध्ये गरुड ज्या पद्धतीने बिबट्यावर हल्ला करतो ते एखाद्या सुपरहिरो चित्रपटातील दृश्यासारखे दिसते.
हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @bdkboypintu नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडिओ खरा नाही तर तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआय वापरून तयार करण्यात आला आहे. ही एक कल्पनाशक्ती आहे जी ग्राफिक्सद्वारे तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्षात, कोणताही गरुड इतका शक्तिशाली नाही की तो बिबट्याला हवेत उचलू शकेल. हा व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करण्यासाठी बनवला गेला आहे आणि तो पूर्णपणे काल्पनिक आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.