हल्ली प्राणी आणि पक्षांचे अनेक व्हिडिओ (Animal Viral Video) व्हायरल होतात. लोकांना ते पहायलाही आवडतात. काही जण प्राणिसंग्रलयात प्राण्यांचे व्हिडिओ, फोटो काढतात. अनेक वेळा या मुक्या जीवांच्या क्यूटनेस आपल्याला असं करण्यास भाग पाडतो. मात्र, असं करण एका मुलीला चांगलच महागात पडलं आहे. एक मुलगी एका महाकाय हत्तीचा व्हिडिओ रेकार्डिंग करत होती. मात्र या गजरादला हे अजिबात आवडलं नाही आणि त्याने रागात त्या मुलीच्या तोंडावर एक ठोसा ठेवून दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ फक्त 7 सेकंदाचा आहे ज्यामध्ये हत्ती निवांत पहुडलेला दिसत आहे. त्याच्यासमोर काही लोक उभे आहेत आणि ते हत्तीची सुंदरता कॅमेऱ्यात कैद करत आहेत. एक मुलगी हत्तीच्या जवळ जाते आणिजारी उभ्या असलेल्या दोन तरुणी आपले कॅमेरे काढून तिचे फोटो काढू लागतात, त्याचवेळी हत्तीने मुलीच्या चेहऱ्यावर सोंडेचा ठोसा मारला, तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या तरुणाने तिला सांभाळले तेव्हा ती पडणार होती. यावेळी तिचा फोनही खाली पडतो. हे पाहून इतर हसायला लागतात.
हा व्हिडिओ ट्विटर युजर @TheBest_Viral ने १३ जानेवारी रोजी पोस्ट केला होता, ज्याला आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि २ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. क्लिप शेअर करताना लिहिले होते- मला रेकॉर्ड करू नका. वृत्त लिहेपर्यंत सर्व युजर्सनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले – मी हसणे थांबवू शकत नाही, तर दुसऱ्याने लिहिले – हत्तीने चमत्कार केले! यावर तुमचे काय मत आहे.
पाहा मजेशीर व्हिडोओ
IN THE FACE @StoolOutdoors pic.twitter.com/gcJKQJtv8D
— Barstool Sports (@barstoolsports) July 2, 2019