(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही नवीन शेअर केलं जात. लोक व्हायरल होण्यासाठी इथे अनेक नवीन प्रकार करताना दिसून येतात मात्र सध्या इथे एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वच भारावून गेले आहेत. व्हिडिओ एका हत्तीसंबंधित असून यात तो आपल्या मित्राची म्हणजेच हरणाची मदत करताना दिसून आला. वेळ आली तर संपूर्ण जग डोक्यावर घेणाऱ्या हत्तीला अशी मदत करताना पाहून सर्वच सुखावून गेले. हा व्हिडिओ फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही भावना असतात ही गोष्ट पटवून देतो. चला तर व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
हे दृश्य दुधवा राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळाले, एका हत्तीने पाण्यात बुडणाऱ्या हरणाला वाचवून सर्वांचे मन जिंकले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात हत्ती पाण्याच्या खड्ड्यात अडकून बुडत असल्याचे दिसून येते. त्याला यातून बाहेर यायचे असते ज्यासाठी तो धडपड करत असतो. हरणाचा हा त्रास पाहून लगोलग तिथे हत्ती पोहचतो आणि आपल्या सोंडेने हरणाला खेचत पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सोंडेने तो हरणाला बाहेर सुखरूप बाहेर काढतो, ज्यानंतर हरीण आनंदाने तिथून पळत सुटतो. व्हिडिओतील हे दृश्य लोकांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरले. गाजराजाने हरणाला केलेली ही मदत हरीण कधीही विसरू शकणार नाही. निसर्ग कितीही क्रूर असला तरी त्याची ही दुसरी बाजू या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते.
An Elephant Helps a Gazelle Avoid Drowning pic.twitter.com/R3EkwIvZms
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) June 6, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हत्ती हरिणाला बुडण्यापासून वाचवतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अशा प्रकारची परोपकाराची भावना दिसून येणे खूप छान आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्राण्यांमध्येही भावना असतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.