बाप बाप असतो! एलॉन मस्कने मुलाला खांद्यावर घेत केला डान्स; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा आश्चर्याचा धक्का देणारे किंवा किळसवाणे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या 2025 च्या स्वागताच्या पार्टीचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जगभरातून अगदी सामान्य नागरिकांपासून ते सरकारी अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांनीच नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. सध्या टेस्ला, स्पेस एक्स आणि एक्सचे मालक एलॉन मस्क यांचा देखील नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नवीन वर्ष 2025 चे स्वागत करण्यासाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत टेस्लाचे मालक इलॉन मस्क देखील उपस्थित होते. या पार्टीतील हा व्हिडिओ आहे. यामध्ये एलॉन मस्क त्यांच्या मुलाला खांद्यावर घेऊन नाचताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एलॉन मस्क यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. त्यांच्या खांद्यावर त्यांच्या मुलागा बसलेला असून ते डान्स करत आहेत. तसेच बाजूला डोनाल्ड ट्रम्प देखील उभे आहेत. मात्र ते फोनवर व्यस्त असल्याचे दिसत आहेत. अमेरिकेच्या राजकारणातील दोन मोठ्या व्यक्तिमत्त्वांना एका मंचावर पाहून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तसच यातून बाप आणि मुलाचे अनोखे नाते देखील उमटून आले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
🚨President Trump, Elon Musk, and Musk’s son X are celebrating New Year’s Eve together at Mar-a-Lago.
— Benny Johnson (@bennyjohnson) January 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ अमेरिकन कमेंटेटर आणि यूट्यूबर बेनी जॉनसन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “राष्ट्रपती ट्रम्प, एलॉन मस्क आणि मस्क यांचा मुलगा एक्स एकत्र मार-ए-लागोमध्ये नववर्ष साजरे करत आहेत.” असे लिहिले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या अद्भुत दृश्याचे कौतुक केले, तर काहींनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जेडी वेंस यांची अनुपस्थिती का होती, यावर प्रश्न उपस्थित केले. या अनोख्या क्षणाने नववर्षाच्या सुरुवातीला मोठ्या चर्चांना वाव दिला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.