कडाक्याच्या थंडीत पाण्यासाह मगरही गोठली (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट याशिवाय अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ पाहायाला मिळतात. सध्या एक आश्चर्यकारकर व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका मगरीचा असून प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या भारतातील विविध भागांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. यामुळे लोक शेकोटीचा आधार घेत आहेत. माणसांप्रमाणेच कडाक्याच्या थंडीत प्राणी आणि पक्ष्यांना देखील याचा फटका बसतो. त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये थंडीमुळे एक मगर अक्षरशः गोठल्याचं दिसतंय, आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्याची लाट उसळली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडिओ एखाद्या तलावाचा असल्याचे दिसत आहे. यामध्ये थंडीमुळे पाण्याचा थर पूर्णपणे बर्फात परिवर्तित झाला आहे. या गोठलेल्या बर्फाखाली मगर दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मगर अजूनही जिवंत आहे पण ती बर्फाच्या खालून बाहेर येऊ शकत नाही. तिने श्वास गुदमरु नये म्हणून बर्फातून आपले नाक बाहेर काढले आहे. आणि अशा प्रकारे ती श्वास घेत आहे. थंडीचा हा थर एवढा कडाक्याचा आहे की प्राण्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. काहींनी या घटनेला नैसर्गिक चमत्कार म्हटलं आहे, तर काहींनी या प्रकारामागील वैज्ञानिक कारणं जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओने सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.