(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात कधी जुगाड तर कधी अचानक घडून आलेले अपघात. इथे अशा अनेक गोष्टी शेअर केल्या जातात ज्या आपण आधी कधीही पहिल्या नसाव्यात. दरम्यान नुकताच इथे दोन चोरांचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांना हादरवले आहे. हे चोर हातात बंदूक घेऊन बाईकवर बसलेल्या एका व्यक्तीला लुटायला आले होते मात्र तितक्यात तो व्यक्ती त्यांना असं काहीतरी बोलतो की चोर उलटे पाय घेऊन पळून जातात. हे दृश्य आता सर्वांनाच हादरवत असून व्यक्ती चोरांना नक्की काय बोलला याची उत्कंठा लोकांना लागून राहिली. चला तर मग नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, काही दरोडेखोर त्या माणसाला लुटण्याचा प्रयत्न करत असताना, तो माणूस शांत राहतो आणि हाताच्या हावभावांनी त्यांच्याशी बोलतो. सुरुवातीला ते हल्लेखोर आक्रमक राहतात पण काही सेकंदांच्या संभाषणानंतर त्यांचे वर्तन बदलते. अचानक ते मागे पडतात, बाईक सुरू करतात आणि निघून जातात. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद होते आणि नंतर जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियावर येतो तेव्हा लोक हैराण होतात. युजर्स आता गोंधळात आहेत आणि व्यक्तीने असे काय सांगितले ज्यामुळे गुन्हेगार घाबरून पळून गेले असा प्रश्न युजर्सना मनात खेळू लागला आहे. व्हिडिओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून लोक आता हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागले आहेत.
घटनेचा व्हिडिओ @danisssssssh_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे . व्हिडिओला चांगले व्युज मिळाले असून लोक कमेंट सेक्शनमध्ये घटनेविषयी आपले मत व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा आमच्या इथलाच व्हिडिओ आहे, हा माणूस म्हणत आहे की तो इम्रानचा माणूस आहे, हे ऐकून ते पळून गेले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ हे युपी आहे इथे असं काही करू नकोस” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटत की तो त्याला ओळखत असावा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.