India-US Trade Deal मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना एनडीए खासदारांकडून हार घालून सत्कार केला (फोटो - सोशल मीडिया)
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे बजेट सादर केले. यानंतर लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. यानंतर आता भारत -अमेरिका व्यापार करारामुळे सत्ताधारी नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सत्ताधारी खासदारांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी अमेरिकी कराराबाबत अभिनंदन केले आहे. तसेच एनडीएच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार घालून त्यांचा सत्कार केला आहे.
हे देखील वाचा : Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या खासदारांनी व्यापारी करारामुळे भलामोठा हार घातला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना मोठा हार घातला. यावेळी गृहमंत्री अमित शाह, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार चिराग पासवान यांच्यासह एनडीए समर्थक खासदार उपस्थित आहेत. यावेळी सर्व खासदारांनी टाळ्यांच्या कडकडात नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#WATCH | Delhi | NDA MPs felicitate PM Modi for the India-US trade agreement, at NDA Parliamentary party meeting in Parliament premises pic.twitter.com/M5nMRwggtn — ANI (@ANI) February 3, 2026
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर भारत आणि अमेरिकेने एक मोठा व्यापार करार अंतिम केला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी घोषणा केली की भारतावर लादलेले कर २५% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आले आहेत, जे तात्काळ लागू होतील. खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही चर्चा भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या उच्चस्तरीय संबंधांचा एक भाग मानली जाते, असे भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे विशेष दूत सर्जियो गोर यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा : Epstein Files चा धमाका! ईमेलमध्ये युवतींचा उल्लेख अन् ‘या’ देशाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला तडकाफडकी राजीनामा, जगभरात खळबळ
या व्यापारी कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “जेव्हा दोन प्रमुख अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा ते आपल्या लोकांना फायदेशीर ठरते आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी असंख्य संधी उघडतात. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व आवश्यक आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो. आमची भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.” असे मोदींनी लिहिले आहे.






