दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये दोन प्रवाशांमध्ये कडाक्याची भांडण झाल्याचे समोर आले आहे. बसण्याच्या जागेवरुन ही भांडणं झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मेट्रोतील भांडणांचे व्हिडिओ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. यावेळी देखील प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या मेट्रोमध्ये बसण्यावरुन भांडण झाली आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, मेट्रोमध्ये लोकांची गर्दी खूप आहे. व्हिडिओमध्ये सीटवर बसलेला एक वृद्ध व्यक्ती चिडून दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो, ‘तू माझ्या डोक्यावर बसशील का?’ यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होतो. ‘तू मूर्ख आहेस का…?’ असं रागाच्या भरात ती व्यक्ती म्हणते, यावर दुसरी व्यक्ती होय म्हणते. शेजारी बसलेली लोकं दोघांनाही समजवून त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Kalesh b/w a Man and a Guy inside Delhi Metro over Seat issues
pic.twitter.com/CBdfl5mbLH— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 8, 2024
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लोकं सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया येत असून वयस्कर व्यक्तीला असे बोलणे योग्य नाही हे देखील नेटकऱ्यांनी मत मांडले आहे.