Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल फोन, स्मार्ट टीवी, एसी, फ्रिज, लॅपटॉपसह इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर सुमारे 70 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल 6 मार्चपासून सुरु झाला आहे. या सेलची शेवटची तारीख 10 मार्च आहे. या सेलमध्ये ग्राहक अनेक वस्तू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनच्या खरेदीवर देखील ग्राहकांना मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत. तसेच सेलमध्ये स्मार्टफोन करेदी करणाऱ्या ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळणार आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या या धमाकेदार सेलमध्ये ग्राहक महागडा आयफोन 17 केवळ 74,900 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. खरं तर भारतात आयफोन 17 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता या डिव्हाईसच्या खरेदीवर फ्लिपकार्टवर 8,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे.
Vivo T4x स्मार्टफोन त्याच्या लाँच किंमतीपेक्षा 1 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन केवळ 16,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी एस25+, नथिंग फोन 3ए प्रो, रिअलमी 14 5जी, मोटोरोला जी96 5जी सह अनेक ब्रँड्सच्या प्रिमियम आणि मिड रेंज किंमतीतील स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट मिळणार आहे.
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये केवळ स्मार्टफोनच नाही तर स्मार्टटिव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 75 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. सेलमध्ये अनेक लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्ट टिव्ही ग्राहकांना अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही 5,599 रुपयांपासून सुरू होणारा स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता, तर 1.5 टनाचा स्प्लिट एसी 25,000 रुपयांपासून सुरू होणारा खरेदी करता येईल.
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहक लॅपटॉप्स, ईयरबड्स, हेडफोन इत्यादी वस्तूंच्या खरेदीवर 50 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. याशिवाय, तुम्ही अॅक्शन कॅमेरे, स्मार्टवॉच, गेमिंग कन्सोल इत्यादी सर्वात कमी किंमतीत घरी आणू शकता.






