(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. यात बरेच धक्कादायक प्रकार पाहायला मिळतात. इथेच बऱ्याच अपघातांचे दृश्ये शेअर केले जातात ज्यांना पाहून आपल्याला धडकी भरेल. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात समुद्रातील एक भीतीदायक दृश्य दिसून आले. आपणा सर्वांना ठाऊकच आहे की, नैसर्गिक आपत्ती किती भीषण रूप घेऊन येत असते. आताच्या व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे समजून येत आहे. यातील दृश्ये पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. आता घटनेत नक्की काय आहे कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रचंड वादळ समुद्राच्या मध्यभागी जहाजांना गिळत असल्याचे दिसून आले.हे दृश्य इतकं धोकादायक आणि भितीदायक आहे की, जो कोणी पाहिला तो घाबरला. साधारणपणे समुद्रात उंच लाटा उसळण्याच्या घटना पहायला मिळतात, परंतु वाळूचे वादळ हा प्रकार फारच कमी आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की जहाज पुढे सरकत असताना अचानक वाळूचा एक मोठा ढग समोर येतो आणि काही क्षणातच जहाज पूर्णपणे त्यात अडकते.
पिल्लू पाण्यात पडताच सिंहिणीचा जीव झाला कासावीस, डोळ्यात साठले अश्रू अन् शेवटी जे घडलं… Video Viral
अशा वाळूच्या वादळांना ‘हबूब्स’ असे म्हटले जाते, जे प्रामुख्याने कोरड्या आणि किनारी भागात जोरदार वाऱ्यांमुळे तयार होतात. जेव्हा गरम हवा जास्त वेगाने वाहते तेव्हा ती वालुकामय पृष्ठभाग उचलते आणि हवेत मिसळते, ज्यामुळे वादळ तयार होते. सहसा ते वाळवंटी भागात दिसते, परंतु जेव्हा ते समुद्रापर्यंत पोहोचते तेव्हा ते दृश्य आणखी धोकादायक बनते. या वादळाचा तडाखा बसलेल्या जहाजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण धूळ आणि वाळूमुळे काही काळ दृश्यमानता जवळजवळ नष्ट झाली होती. निसर्ग किती शक्तिशाली आणि अप्रत्याशित असू शकतो हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध होते.
Enormous sand storm engulfs these ships at sea pic.twitter.com/UHdhRmzTYN
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 14, 2025
घटनेचा व्हायरल व्हिडिओ हा @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘समुद्रात जहाजांना वाळूचे प्रचंड वादळाने वेढले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या व्युज मिळाल्या असून अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “महाकाय हबूब्स पाहणे नेहमीच अद्भुत असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या मध्ये अडकणे हे फार धोकादायक ठरेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.