(फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही आजवर सोशल मीडियावर अनेक अजब-गजब, आपल्याला हैराण करणारे व्हिडिओज व्हायरल पाहिले असतील. इंटरनेटवर नेहमीच आश्चर्यकारक व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र सध्या इथे एक अनोखा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यातील दृश्ये तुम्ही याआधी कधीही पाहिली नसतील. यात चक्क एक बकरी गावत खाण्यासाठी विजेच्या तारांवर चढल्याचे दिसून आले. होय, हे खरे आहे. आता हे कसं घडलं आणि बकरी मुळात विजेच्या तारांवर चढ़लीच कशी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
लग्नमंडपच बनला आखाडा! मेव्हणीला नाराज केल्याने वऱ्हाडाला केले कुलूपबंद; पहा Viral व्हिडिओ
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बकरी विजेच्या तारांवर चढून गवत खात असल्याचे दिसून येते. हे अनोखे दृश्य पाहून सोशल मीडियावर जो तो हैराण झाला आहे. व्हिडिओतील हे दृश्य इतके अनोखे होते की काही वेळातच या व्हिडिओला हजारो व्युज मिळाले.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बकरी विजेच्या खांबाला लटकलेल्या तारांवर उभी आहे आणि गवत खात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर अनेक लोक याला एआय जनरेटेड व्हिडिओ म्हणत आहेत. तथापि, बकऱ्या या आपल्या चढाई क्षमतेसाठी ओळखल्या जातात. पर्वत असोत किंवा झाडे, पण विजेच्या तारांवर आणि गवतावर संतुलन साधणे हा एक असाधारण दावा वाटतो. विजेच्या तारांवर विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो आणि कोणत्याही प्राण्याला तोल राखणे, त्यावरून चालणे आणि गवत चरणे खूप कठीण असते. डोंगराळ शेळ्या सहजपणे उंच खडकांवर चढू शकतात. पण विजेच्या तारांवर चालणे हे एक वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे कारण त्यासाठी संतुलन तसेच विद्युत धोक्यांपासून संरक्षण आवश्यक आहे. या सर्वच बाबी लक्षात घेता या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
อันแม่ถามคำหนึ่งได้บ่ลูก pic.twitter.com/m4UY5m7PvW
— Red Skull (@RedSkullxxx) April 5, 2025
जंगल तोड थांबवा! भर चौकात झाडाच्या वेषात तरुणाने माणसांना दाखवला आरसा, Video Viral
आता हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याबाबत जरी कोणता ठोस पुरावा मिळाला नसला तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @theindiansarcasm नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एडिट केलेला व्हिडिओ दिसतोय. आणखी काय मत आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जमिनीवरील गवत संपले तेव्हा शेळीने आकाशाचा मार्ग निवडला.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.