(फोटो सौजन्य – Instagram)
आपला देश प्रगत होत आहे, तंत्रज्ञानाने देशाला एका नव्या उंचावर नेऊन ठेवले आहे मात्र यासोबतच देशातील गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत चालले आहेत. आता तर फक्त महिलाच काय तर पुरुषांवरील अन्यायाच्याही अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. या घटना अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हत्याकांडाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या घटनेत महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून स्वतःच्याच पतीची हत्या केली. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच तापले असतानाच आता सोशल मीडियावर आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक महिला स्वतःच्याच पतीला जीवे मारण्याची धमकी देताना दिसून आली. नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
लग्नमंडपच बनला आखाडा! मेव्हणीला नाराज केल्याने वऱ्हाडाला केले कुलूपबंद; पहा Viral व्हिडिओ
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या पतीला धमकी देताना स्पष्ट दिसून येत आहे. महिला प्रचंड भडकलेली आहे आणि यावेळी ती आपल्या पतीला धमकवताना दिसून येते. यावेळी ती आपल्या पतीला, मी तुझे 200 तुकडे करेल अशी जीवघेणी धमकी देताना दिसून येते. व्हिडिओतील ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक आता महिलेवर संताप व्यक्त करत आहेत. डिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती मिळाली आहे.
व्हिडीओमध्ये महिला म्हणते की, “मी सोशल मीडियावर काही लपवत नाही आहे. मला जन्मठेप झाली तरी चालेल, फाशी मिळाली तरी चालेल. पण तुझी अशी अवस्था करेन की आजवर कोणत्या मुलीने आपल्या नवऱ्याची अशी अवस्था कधी केली नसेल. असा राग घेऊन मी जगतेय ना, माझे हात बांधलेले आहेत की माझी मुलं आहेत म्हणून नाहीतर मी तुझे एवढे तुकडे करीन ना, की कोणी बघूही शकणार नाही. एवढा विचार कर तू… हा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर तू दाखवशील ना…”.
जंगल तोड थांबवा! भर चौकात झाडाच्या वेषात तरुणाने माणसांना दाखवला आरसा, Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @indians नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून आतापर्यंत अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपल्याला मागची गोष्ट माहित नाही.. म्हणून इतक्या लवकर निर्णय घेऊ नका…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पडद्यामागे तिला मानसिक धक्का बसला असावा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.