(फोटो सौजन्य: X)
पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर अंतरावर जेव्हा एखादा एस्ट्रोनॉट्स अनेक महिने अंतराळात राहतो तेव्हा त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. अंतराळ हा नेहमीच सामान्य लोकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे, याबाबतची माहिती लोकांसाठी आता सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनानंतर पुन्हा एकदा अनेक प्रश्न लोकांच्या मनात घर करू लागले आहेत. अंतराळवीर अंतराळात गुरुत्वाकर्षणाशिवाय कसे झोपतात हा लोकांच्या मनातील एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द सुनीता विल्यम्स सर्वांसोबत शेअर केले आहे.
वास्तविक, सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनानंतर तिचे अनेक जुने व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती स्पेस स्टेशनमध्ये दिसत आहे. यातीलच एका व्हिडिओमध्ये सुनीता अवकाशात कशी झोपते ते सांगताना दिसली, तिचा हा व्हिडिओ आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये पाहून अनेक लोक थक्क झाली आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ आता शेअर केला जात आहे.
या व्हिडिओमध्ये सुनीता विल्यम्स सांगत आहेत की, लोक तिला अनेकदा हाच प्रश्न विचारतात की अंतराळात ती कशी झोपते. लोकांना वाटते की, ती जागेवर पडून झोपत असावी, पण तसे नाही. कारण पडून राहून तुम्ही हवेत असता आणि तुम्हाला पलंगाचा आधार मिळत नाही. स्पेसमध्ये झोपण्यासाठी, स्लीप स्टेशन बनवले जातात, ज्यामध्ये झोपण्याची पिशवी असते. व्हिडीओमध्ये सुनीता विल्यम्सने या स्लीप स्टेशनवर जाऊन ती अंतराळात कशी झोपते ते दाखवले आहे.
Ohhh my god 😱🫣😍 zero gravity#sunnithawilliams#SpaceStation pic.twitter.com/S7SxkppUoi
— 🅳🅰🅳🅳🆈’🆂 🅶🅸🆁🅻🏋🏻 (@im_saraahh) March 18, 2025
जेव्हा सुनीता विल्यम्स तिच्या स्लीप स्टेशनवर जाते तेव्हा ती सांगते की, ते फोन बूथसारखे आहे. इथे झोपायला फारशी अडचण नाही, कारण तुम्ही सगळीकडे हवेत उडत नाही. परंतु यात त्यांना त्या उलट्या झाल्या आहेत हे जाणवून येत नाही तर आपण उभे आहोत असेच वाटू लागते. या झोपण्याच्या जागेत पुस्तके, लॅपटॉप आणि कपडे ठेवल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ @im_saraahh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.