वाराणसी : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) दररोज काहीतरी अनोखे पाहायला मिळते. कधी ट्रॅफिक पोलिसांकडून (Traffic Police) चालान कापले जाऊ नये म्हणून तिथले लोक पोलिसांना चकमा देतात, तर कधी कोणी त्याचा अभिमान झुगारून देतात. मात्र पोलिस त्यांचे ऐकत नाहीत आणि चालान कापण्याची कारवाई करतात. काशी शहर वाराणसीमध्ये तरुण पिढी असे काही करते की सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होते. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतात.
युपीच्या काशी शहर वाराणसीमध्ये एका तरुणाच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर (Number Plate) ‘योगी सेवक’ (Yogi Sevak) असे लिहिलेले आढळले. जे त्याला चांगलंच भारी पडलं आहे. वाराणसी पोलिसांनी त्या तरुणाला ६,००० रुपयांचे चालान बजावले आहे. बाईकची नंबर प्लेट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली आणि चांगलीच व्हायरल झाली. नंबर प्लेट भगव्या रंगाची असून त्यावर पांढऱ्या रंगात योगी सेवक असे लिहिले होते.
[read_also content=”घरफोडी सहित मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांनी घातल्या बेड्या; स्थानिकांमध्ये निर्माण झाली होती चांगलीच दहशत https://www.navarashtra.com/maharashtra/increase-in-cases-of-mobile-phone-theft-including-burglary-police-arrested-there-was-a-lot-of-panic-among-the-locals-nrvb-371524.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणाच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर योगी सेवक असे लिहिले होते, तो वाराणसीच्या भोजुबीर चौकातील रहिवासी आहे. हा तरुण काही कामानिमित्त दुचाकीवरून वाराणसी येथील बाजारपेठेत जात होता त्याचवेळी रस्त्यावर उपस्थित वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडवले.
[read_also content=”निक्की यादव हत्याकांड : आरोपी साहिल गेहलोतचा तुरुंगातील मुक्काम वाढला; सुनावली १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी https://www.navarashtra.com/crime/nikki-yadav-murder-case-update-accused-sahil-gehlot-court-sent-to-judicial-custody-for-12-days-nrvb-371506.html”]
पोलिसांनी दुचाकीची नंबर प्लेट पाहिल्यानंतर त्या तरुणाच्या दुचाकीचे सहा हजार रुपयांचे चलन कापले. अंकित दीक्षितच्या नावाने हे चलन कापण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्स तरुणावर जोरदार ताशेरे ओढत आहेत.