परंपरेला मॉडर्न टच! नऊवारी साडीत इंग्रजी बीट्सवर महिलांनी धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. यामध्ये लावणी, ट्रेंडिग गाणी, बॉलीवूडची गाणी, जुनी गाणी, इंग्रजी गाणी अशा वेगवेळ्या गाण्यांवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही महिलांनी नऊवारी साडीत ठेका धरला आहे. परंतु या महिलांना केवळा पारंपारिक रुपात ठेकाच धरला नाही तर एका इंग्रजी गाण्यावर डान्स केला आहे. या महिलांना परंपरेला मॉडर्न टच दिला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिलांचा ग्रुप दिसत आहे. सर्व महिलांनी नऊवारी साडी नेसली आहे. सर्वांनी छान असा मेकअप केला आहे, तसेच छान छान दागिने घातले आहे. सर्व महिला नऊवारी साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. याच वेळी बॅकग्रांउडमध्ये एक इंग्रजी गाणे वाजत आहे. या इंग्रजी गाण्यावर महिलांनी ठुमका धरला आहे. तुम्ही पाहू शकता की, चिप थ्रिल्स या लोकप्रिय इंग्रजी गाण्यावर महिला डान्स करत आहे. हे गाणे एका ऑस्ट्रेलियन गायिकेने गायले असून खूप लोकप्रिय आहे. या गाण्यावर महिलांनी जबरदस्त ठेका धरला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Nath & Heels Group (Mangalagauri, Dohalejevan Group) (@nath_and_heels)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम @nath_and_heels या अंकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी महिलांचे कौतुक केले आहे. एका युजरन ” खूपच भारी सगळ्या अगदी मस्त करत आहात” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने “संसाराची जबाबदारी सांभाळून महिला असा आनंद जेंव्हा लुटतात तेंव्हा यांना कोणी अडवूच नये असे वाटत” असे म्हटले आहे. आणखी एका युजरने छान डान्स केला पण मराठी गाणं असत तर मजा आली असती असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.