एटीमधून पैशांचा वर्षाव! ५०० टाकले अन् १००० बाहेर; माहिती मिळताच गावकऱ्यांनी घेतला फायदा, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच सत्य घटनांवर आधारित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाच व्हायरल होत आहे.
तुम्हाला जर लॉटरी लागली तर तुमचा आनंदाला सीमा नसेल. तुम्ही तुमचे प्रत्येक स्वप्न पुर्ण कराला. पार्टी कराल, शॉपिंग कराल. किंवा तुम्हाला रस्त्यावरुन जाताना १० रुपये जरी मिळाले तरी तुम्हाला तितकाच आनंद होईल. सध्या असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशाच्या आग्रातील गावकऱ्यांनी अनुभवला आहे. आग्रातील गावकऱ्यांना ५०० ऐवजी १००० रुपये मिळाले आहे. आता हे कसे असा प्रश्न तुम्ही विचाराल, तर आग्रातील एका एटीममधून पैशांचा पाऊस पडला आहे. पण नेमकं काय घडले की या गावकऱ्यांना ५०० ऐवजी १००० रुपये मिळाले.
तर आग्रातील मलपुरा येथील एका एटीममधून लोकांनी ५०० रुपये काढले की हजार रुपये मिळत होते. यामुळे एटीएमच्या बाहेर लोकांची तुफान गर्दी जमली होती. अनेकजण आपले एटीएम घेऊन पैसे काढण्यासाठी धावले होते. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच यामुळे एटीएम बाहेर चेंगराचेंगरी देखील झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एटीएमकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, वन इंडिया बॅंकेच्या एटीएममदून ५०० रुपये काढल्यावर लोकांना ११०० रुपये मिळत होते. ही बातमी गावभर पसरली. यानंतर लोकांनी एटीएमकडे धाव घेतली. जवळपास ५० ते ६० लोक एटीएमकडे पळाले होते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#आगरा में ATM पर 500 की जगह 1100 रुपए निकलने पर लग गई लोगों की भीड़।
मलपुरा थाना क्षेत्र में स्थित ATM पर आया टेक्निकल फॉल्ट बैंक को सूचना देकर ATM को कराया गया बंद।#Agra #ATM #UttarPradesh pic.twitter.com/ac1eiq9Bh0
— Abhishek R Ojha Journalist (@ojha_journalist) June 22, 2025
गावातील एका व्यक्तीने एटीएममधून ५०० रुपये काढले होते, परंतु त्याच्या हाती ११०० रुपये आले. त्याला काहीतरी चूकीचे वाटले म्हणून त्याने दुसऱ्यावेळेसही पैसे काढले. पुन्हा तेच घडले. यानंतर ही बातमी हळहळू गावभर पसरली आणि गावकऱ्यांची एटीएम बाहेर पैशासाठी तुफान गर्दी जमली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच एटीएमकडे धाव घेतली. लोकांना तिथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी एटीएम बंद केले आहे. या घटनेचा तपासात पोलिसांनी तांत्रिक बिघडामुळे एटीएममधून हे पैसे निघत असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ एटीएम बंद केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.