(फोटो सौजन्य – X)
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवनवीन विदारक दृश्ये समोर येत आहेत. पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या हल्ल्यात लग्नानंतर फिरायला आलेल्या जोडप्यांनाही टार्गेट करण्यात आलं. हल्ल्याचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज समोर येत आहेत. अशातच एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. फोटोतील भयाण आणि हृदयद्रावक दृश्ये मनावर खोल वार करणारी असून मोठ्या प्रमाणात आता याला शेअर केले जात आहे. यात एक नववधू आपल्या मृत्युमुखी पडलेल्या पतीशेजारी बसून शोक व्यक्त करताना दिसून आली.
हनिमूनसाठी हे कपल पहलगाम येथे फिरायला गेले होते. मात्र त्यांचे सुखाचे दिवस क्षणार्धातच दुःखात बदलले. माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला फक्त १८ दिवस पूर्ण झाली होती. नवविवाहित जोडप्याचा स्वप्नातील प्रवास भयावह परिस्थितीत बदलला, दहशतवाद्यांनी पतीला त्यांचे नाव आणि धर्म विचारल्यानंतर त्याच्यावर गोळीबार करत ठार मारले. हे सर्व दृश्य पत्नी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत राहिली. पतीला वाचवण्यासाठी तिने लोकांना आवाहनही केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मानाने ती पतीच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव सर्वांच्याच काळजात चीर पाडण्यासारखे आहेत.
ohh no, got emotional every time I see this picture on my TL.
A newlywed couple, full of life & hope, brutally taken away by cowardly terrorists. 12 wounded & 27 innocent souls lost in #Pahalgam terr@rist attack. It wasn’t an attack on hindus but on humanity too.
Enough is enough pic.twitter.com/Xywn42QnJS— HeisenKey𝕏 (@KNandd) April 22, 2025
या हल्ल्यात आतापर्यंत 28 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून या आकडेवारीत वेळोवेळी वाढ होत आहे. तसेच हल्ल्यात काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आताचा हा व्हायरल फोटो @KNandd नावाचा एक्स अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. फोटोच्या भावनिक कॅप्शन देण्यात आले आहे ज्यात, ‘अरे नाही, माझ्या TL वर हे चित्र पाहिल्यावर मी भावनिक झालो. जीवन आणि आशेने भरलेले एक नवविवाहित जोडपे, भ्याड दहशतवाद्यांनी क्रूरपणे हिरावून घेतले. #पहलगाम दहशतवादी हल्ल्यात १२ जखमी आणि २७ निष्पाप जीव गेले. हा हिंदूंवर हल्ला नव्हता तर मानवतेवरही हल्ला होता. पुरे झाले आता पुरे’ असे लिहिले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही