'Gen Z' म्हणजे वेगळंच रसायन! हवनच्या धुरापासून वाचण्यासाठी चिमुकल्याचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले,... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चिमुकला पूजेला हवनच्या वेळी आर्यन मॅनचा मास्क घालून बसला आहे. हवनमध्ये धूराच्या त्रासपासून ही भन्नाट आयडिया त्याने वापरली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गणपती बप्पाची पुजा सुरु आहे. याच वेळी हवनही सुरु आहे. येथेच एक चिमुकला आयर्न मॅनचा मास्क घालून बसला आहे.
या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातली असून जनरेशन Gen Alpha is built Different असे सगळेजण म्हणत आहे. खरे तर Gen Z जनरेशनला सगळ्यात हुशार म्हणून ओळखले जाते, पण अलीकडे Gen Alpha ही जनरेशन त्यांच्याही पुढे गेल्याचे या व्हिडिओतील उदाहरणावरुन कळून येते.
जनरेशन Gen Z ला डिजिटल तंत्रज्ञानाने कुशल, समाजिक समस्यांवर जागरुकता असलेली, हवामानाच्या बदलावर आणि मानसिक समस्यांवर व्यावहारिक दृष्टीकोन बाळगणारी म्हणून ओळखले जातात. ही जनरेशन कम्युनिकेशन आणि मानिसक आरोग्याला अत्यंत महत्व देते. या जनरेशनने जुन्या काळातील मोबाईलफोन पासून ते स्मार्टफोनपासून सर्वकाही पाहिले आहे. यामध्ये १९९७ ते २०१० पर्यंत जन्मलेल्या मुलांचा समावेश आहे.
२०१०च्या पुढची जनरेशन Gen Alpha ला जन्मापासूनच तंत्रज्ञाच्या आणि AI डिजिटलचा अनुभव मिळाला आहे. या जनरेशनला स्क्रीनवर सतत वेळ घालवत असल्याच्या कारणावरुन iPad kid म्हटले जाते. AI तंत्रज्ञाबरोबर यांचा विकास होत आहे. या जनरेशनची मुले सामानता आणि पर्यावरणाला अधिक महत्व देतात. यांच्या जीवनात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभाव आहे.यामुळे त्यांना Digital Native असेही म्हटले जाते.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sunidhi_kohli_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र याची चर्चा सुरु असून भविष्यात येणाऱ्या जनरेशन कशी असेल याचीही चर्चासुर आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने ही पिढी वेगळीच आहे, असे म्हटले आहे. तर एकाने इट्स हवन मॅन असे म्हटले आहे, आणखी एका नेटकऱ्याने ही पिढी निश्चितच खूप हुशार आहे, असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाही आश्चर्यचकित व्हाल.
मगरींच्या जाळ्यात अडकला छावा, इतक्यात गरुड आला अन् घडला चमत्कार; व्हिडिओ पाहून लोक हैराण, म्हणाले…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.